वाचमेन म्हणून काम करणाऱ्या २७ वर्षीय तरुणीवर सतत चार वर्ष लैंगिक अत्याचार, पोलिसात गुन्हा दाखल…!

Rokhthok Maharashtra 1 0

पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या एका २७ वर्षे तरुणीवर चार वर्ष बळजबरीने लैंगिक अत्याचार करून ती गर्भवती राहिल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले, त्यामुळे पीडित तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर येरवडा पोलिसाकडे हा गुन्हा तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे.

या तरुणीच्या २३ वर्षीय मित्रा विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, राकेश अंकुश विटकर (२३, रा. आपले घर सोसायटी जवळ, सर्यप्रकाशनगर, खराडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २७ वर्षीय तरूणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, गुन्हा तपासासाठी येरवडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे, डिसेंबर २०१८ ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला असल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कवितके करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.