पुण्यातील आरटीओमध्ये भीषण आग; आगीत 10 गाड्या जळून खाक…!

Rokhthok Maharashtra 13 0

पुणे: प्रतिनिधी( रमेश निकाळजे )

पुणेः आज पुण्यातील एका आरटीओमध्ये भीषण आग लागली, या आगीमध्ये जप्त केलेल्या १० गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे, ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळाली नसून याचा तपास सुरु आहे १० गाडयांची राख झाल्याची माहिती मिळाली आहे, गेल्या काही महिन्यांमध्ये पुण्यात अशा आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

 

सुदैवाने आज मकर संक्रांतीची सुट्टी असल्याने कसल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही,पुण्यातील विश्रांतवाडीमध्ये आरटीओ कार्यालयाच्या आवारात जप्त केलेल्या गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या,यावेळी लागलेल्या आगीमध्ये ४ चारचाकी, ४ लक्झरी बस, १ डंपर आणि १ टेम्पो जाळून खाक झाले आहेत, आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करत आगीवर नियंत्रण मिळवले आहे, रविवारी आर टी ओ कार्यालय बंद होती त्यामुळे आग लागली की लावली अशी शंका व्यक्त केली जात आहे, काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्येही अशीच आग लागण्याची घटना घडली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.