बुधवार पेठ हत्या प्रकरणाचा निकाल; ५० हजारांचा दंडही ठोठावला.

Rokhthok Maharashtra 26 0

पुण्यातील बुधवार पेठेतील २०१७ मधील गाजलेल्या हत्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. २२ वर्षीय प्रेयसीची चाकूने हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश रजनी क्षीरसागर यांनी आरोपी सुखदेव रामदास मडावी याला दोषी ठरवले. सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, तरुणीने संबंध तोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे झालेल्या वादातून आरोपीने तिच्यावर चाकूने वार करून हत्या केली होती.
ही घटना २३ मे २०१७ रोजी बुधवार पेठेतील जनता बिल्डिंग परिसरात घडली होती. घटनेनंतर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत एका पोलिस कर्मचाऱ्याला दुखापत झाली होती, मात्र आरोपीला ताब्यात घेण्यात यश आले.
या खटल्यात १४ साक्षीदारांच्या जबाब आणि अन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.