एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय? 4 मंत्री डेंजर झोनमध्ये; संजय शिरसाटांबाबत मोठी चर्चा!

Rokhthok Maharashtra 22 0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चर्चा रंगली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आता राज्य मंत्रिमंडळातही फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेच्या काही मंत्र्यांच्या कामगिरीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. चार मंत्री ‘डेंजर झोन’मध्ये असल्याचं बोललं जात असून, त्यांच्या खात्यांमध्ये बदल किंवा मंत्रिमंडळातून वगळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यामध्ये मंत्री संजय शिरसाट यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. काॅक्रोज जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांची त्यांनी घेतलेली भेट वादाचा विषय ठरली. या भेटीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे. तसेच भाजपमधील काही नेत्यांनीही या भेटीच्या वेळेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, भाजप आमदार राम कदम यांनी मात्र स्पष्ट केलं की, राजकारणात भेटीगाठी होऊ शकतात. मात्र दीपके यांच्या पार्श्वभूमीमुळे ही भेट योग्य वेळी झाली नाही. त्याचवेळी त्यांनी संजय शिरसाट यांचं काम चांगलं असल्याचं सांगत, मंत्रिपद जाणार असल्याच्या चर्चेला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
सध्या या सर्व घडामोडी सूत्रांच्या माहिती आणि राजकीय चर्चांवर आधारित असून, सरकारकडून मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.