Instagram मैत्रीचं भयाण रूप! सरकारी अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

Rokhthok Maharashtra 2 0

छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे…
इन्स्टाग्रामवर झालेली ओळख एका विवाहित महिलेला महागात पडली…
सरकारी उपअभियंत्याने प्रेमाचं आमिष दाखवत तिचा विश्वास जिंकला…
आणि नंतर तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन जबरदस्ती संबंध ठेवल्याचा आरोप आहे…

इतकंच नाही, तर आरोपीने व्हॉट्सॲप चॅट आणि खासगी माहितीचा वापर करून
पीडितेला ब्लॅकमेल केल्याचंही समोर आलं आहे…
जुलै ते ऑक्टोबर 2025 दरम्यान हा प्रकार सुरू होता…
अखेर त्रास सहन न झाल्याने महिलेने सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली…
पोलिसांनी आरोपी उपअभियंत्याविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे…
जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीकडून असा प्रकार घडल्याने
सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे…

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.