कर्नाटकात ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना HIV संसर्ग; आरोग्य विभाग सतर्क!

Rokhthok Maharashtra 6 0

कर्नाटकातून एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. राज्यातील १८ ते २५ वयोगटातील ७ हजारांहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एचआयव्ही संसर्ग झाल्याची नोंद झाली असून, यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, कर्नाटकात सुमारे २ लाख ६० हजार नागरिक एचआयव्हीसह जीवन जगत आहेत. यापैकी ५४ ते ५६ हजार जणांना आपल्याला एचआयव्ही संसर्ग झाल्याची माहितीच नसल्याचे सांगण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य एड्स प्रतिबंधक सोसायटी आणि उच्च शिक्षण विभागाने अभियांत्रिकी तसेच पदवी महाविद्यालयांमध्ये एकात्मिक आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
या शिबिरांमध्ये एचआयव्हीसह इतर संसर्गजन्य आजारांची तपासणी, समुपदेशन आणि जनजागृती केली जाणार आहे.
दरम्यान, एचआयव्ही चाचणी पूर्णपणे ऐच्छिक असून विद्यार्थ्यांची पूर्वसंमती आवश्यक राहणार आहे. तसेच गोपनीयता जपत स्व-जोखीम तपासणीसाठी क्यूआर कोड आधारित सुविधा उपलब्ध करून देण्याचीही योजना सरकारने आखली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.