नंदिनी टकले नगरमधील खड्ड्यांची समस्या अखेर मार्गी; नागरिकांना दिलासा

Rokhthok Maharashtra 31 0

मांजरी बुद्रुक : नंदिनी टकले नगर परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना ये-जा करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या समस्येची गांभीर्याने दखल घेत पत्रकार तुकाराम गोडसे यांनी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केला.

परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पुणे महानगरपालिकेचे हडपसर मांजरी क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त कुणालकुमार धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता सोमनाथ वासकर यांनी तातडीने डांबरीकरण करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुकादम संजय कुलुत यांनी तात्काळ डांबरीकरणाचे काम करून रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठी कार्यवाही केली.या वेळी उद्योजक नितीन टकले उपस्थित होते.

दरम्यान, नंदिनी टकले नगरमधील रहिवाशांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. पत्रकार तुकाराम गोडसे यांनी तात्काळ पाठपुरावा करून काम करून घेतल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला, अशी प्रतिक्रिया रहिवाशांनी व्यक्त केली.

“आम्ही नंदिनी टकले नगरमधील रहिवासी आहोत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे आम्हाला ये-जा करताना त्रास होत होता. पत्रकार तुकाराम गोडसे यांनी तात्काळ पाठपुरावा करून हे काम करून घेतले. त्यामुळे आम्ही नागरिक समाधानी आहोत.”

— रमेश ताकवणे
रहिवासी, नंदिनी टकले नगर, मांजरी बुद्रुक

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.