सलमान खान इतका बारीक का दिसतोय? अखेर भाईजाननेच सांगितलं खरं कारण

Rokhthok Maharashtra 28 0

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा भाईजान सलमान खान अचानक इतका सडपातळ का दिसतोय? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आता याचं उत्तर स्वतः सलमान खानने दिलं आहे.
एका कार्यक्रमादरम्यान भाऊ सोहेल खानसोबत गप्पा मारताना सलमानने सांगितलं की, त्याने तब्बल १६ किलो वजन कमी केलं आहे. त्याचे शब्द होते, “I am down 16 kg.”
सोहेलने स्वतः १२ किलो वजन कमी केल्याचं सांगितल्यानंतर सलमाननेही आपला फिटनेस प्रवास उघड केला. हा बदल कोणत्याही आजारामुळे नसून, आगामी चित्रपट आणि फिटनेस गोल लक्षात घेऊन मुद्दाम वजन कमी केल्याचं त्याने स्पष्ट केलं.
सलमानचा फिटनेस प्रवास अजूनही सुरू असून, ठरवलेलं लक्ष्य गाठण्यासाठी तो नियमित व्यायाम आणि डाएट पाळत असल्याचंही त्याने सांगितलं.
म्हणूनच, सलमानच्या तब्येतीबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.