नगरकर ज्वेलर्सच्या लकी ड्रॉमध्ये इलेक्ट्रिक कार जिंकली!

Rokhthok Maharashtra 6 0

पुण्यातील प्रसिद्ध एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या पहिल्याच लकी ड्रॉला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या लकी ड्रॉमध्ये विजेत्यांना चक्क इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक दुचाकी आणि आयफोन १७ अशी आकर्षक बक्षिसे मिळाली आहेत.
नगरकर ज्वेलर्सच्या तुळशीबाग, लक्ष्मी रोड, कोथरूड, ठाणे आणि बाणेर या पाचही दालनांमध्ये २४ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या लकी ड्रॉमध्ये सहभागी होता आले.
१५ नोव्हेंबर रोजी बाणेर येथील दालनात पारदर्शक पद्धतीने लकी ड्रॉ काढण्यात आला.
यामध्ये पहिले बक्षीस टाटा टियागो इलेक्ट्रिक कार डॉ. अर्चना पवार यांनी जिंकली. दुसरे बक्षीस इलेक्ट्रिक अॅक्सेस दुचाकी डॉ. आसावरी कानडे यांना मिळाली, तर तिसरे बक्षीस आयफोन १७ सोनाली बागडे यांनी पटकावला.
यावेळी नगरकर ज्वेलर्सचे संचालक वसंत नगरकर, स्वाती वल्लभ नगरकर, वासंती वसंत नगरकर, प्रसाद नगरकर, पुष्कर नगरकर, पूजा नगरकर कुलकर्णी आणि रोहन कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी पुष्कर नगरकर यांनी ग्राहकांच्या भरघोस प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला. तर प्रसाद नगरकर यांनी बाणेर दालनातील राजवाडा कलेक्शनची खासियत सांगितली.
ग्राहकांचा विश्वास आणि प्रेम यामुळेच नगरकर ज्वेलर्सचा व्यवसाय विस्तारत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.