MIM नगरसेवक मतीन पटेल अडचणीत; पहाटे प्रशासनाची धडक कारवाई

Rokhthok Maharashtra 11 0

एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल याच्यावर गंभीर आरोपांनंतर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
धर्मांतर रॅकेट चालवल्याचा आणि महिलांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप असलेल्या या प्रकरणात प्रशासनाने त्याचं बेकायदेशीर बांधकाम पहाटे भुईसपाट केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, मतीन पटेल याने निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसंच काही हिंदू महिलांना ब्लॅकमेल करून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचाही दावा केला जातोय.

कारवाई थांबवण्यासाठी संबंधितांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
मात्र न्यायालयाकडून कोणताही दिलासा न मिळाल्यानंतर प्रशासनाने पहाटे मोठा बंदोबस्त ठेवून ही कारवाई केली.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली.
या प्रकरणाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.