NEET पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर परभणीत दुःखद घटना; डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्ण

Rokhthok Maharashtra 3 0

नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. गंगाखेड तालुक्यातील गोदावरी तांडा येथील 19 वर्षीय प्रथमेश राठोड याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रथमेश हा डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नीट परीक्षेची तयारी करत होता. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, परीक्षा दिल्यानंतर तो आनंदी होता. मात्र पेपरफुटीच्या चर्चेनंतर तो चिंतेत असल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेनंतर प्रथमेशच्या कुटुंबीयांनी पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांवर होणाऱ्या मानसिक परिणामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची नोंद पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण, स्पर्धा परीक्षा आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.