धक्कादायक :- PUNE CRIME – ग्रुप मधून रिमूह केल्याच्या कारणावरून ऍडमिन ला बेदम मारहाण मारहाणीत ऍडमिनाच्या जिभेला गंभीर दुखापत…!

Rokhthok Maharashtra 1 0

पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

पुण्यातील फुरसुंगी गावात (Fursungi) हा धक्कादायक प्रकार घडला आहे, सोसायटीतील सदस्यांनी काढलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केल्याच्या रागातून बाचाबाची होऊन पाच जणांनी ग्रुप अ‍ॅडमिनला बेदम मारहाण केल्याची घटना घडली, मारहाणीत या टोळक्याने अ‍ॅडमिनची जीभच कापल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे, त्यांच्या जीभेला टाके पडले असून, यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, त्यावरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला, आहे ,तक्रारदार आणि आरोपी एकाच सोसायटीत राहत असल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीत सांगण्यात आले आहे , सोसायटीतील रहिवाशी असणाऱ्या व्यक्तींचा तक्रारदारांच्या पतीने “ओम हाईट्स ऑपरेशन” या नावाने व्हॉट्सअप ग्रुप काढला होता, त्यात सर्व सदस्य होते, तक्रारदार यांचे पती या ग्रुपचे अ‍ॅडमिन होते, दरम्यान त्यांनी या ग्रुपमधून सोसायटीतील एका व्यक्तीला रिमूव्ह केले, याचा राग आरोपींच्या मनात होता, त्यांनी रिमूव्ह का केले असा मॅसेज तक्रारदारांच्या पतीला व्हॉट्सअपला टाकून विचारणा केली, पण त्यालाही तक्रारदार यांच्या पतीने उत्तर दिले नाही.

फोन करूनही उत्तर देत नसल्याने आरोपींनी तक्रारदारांच्या पतीला फोन करून भेटायचे आहे, असे सांगून भेटण्यास बोलावले, तक्रारदार आणि त्यांचे पती ऑफिसमध्ये असताना आरोपी त्या ठिकाणी आले, त्यांनी ग्रुपमधुन मला का काढून टाकले, अशी विचारणा केली. त्यावेळी ग्रुपमध्ये कोणीही कसलेही मॅसेज टाकत असल्याने ग्रुपच बंद केला असल्याचं सांगितलं, यावरुन संतापलेल्या पाच जणांनी ग्रुप ऍडमिन ला बेदम मारहाण केली, त्यातच त्यांच्या तोंडावर मारहाण केल्याने ऍडमिन ची जीभ कापली गेली आणि ते गंभीर जखमी झाले आहेत, तसेंच त्यांच्या जिभेला टाके पडले आहेत, असे डॉकटरांनी सांगितले आहे पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.