“शिवाजीराव भोसले बेंकेचे संचालक माजी आमदार अनिल भोसले यांची २६ कोटी ६० लाख रुपयांची मालमत्ता ई डी ने केली जप्त”

Rokhthok Maharashtra 1 0

प्रतिनिधी- स्वप्नील कदम

लोणी काळभोर -शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी माजी आमदार अनिल शिवाजीराव भोसले यांची २६ कोटी ६० लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

या गैरव्यवहार प्रकरणात बँकेचे संचालक अनिल शिवाजीराव भोसले, सूर्याजी पांडुरंग जाधव, नूसर शनूर मुजावर यांच्यासह अन्य आरोपींच्या विरोधात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई केली होती. ईडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात काळा पैसे हस्तांतरण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

भोसले यांच्या पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २६ कोटी ६० लाख रुपयांच्या मालमत्तेबरोबरच १ कोटी ६ लाख रुपयांच्या डिमेट खात्याच्या इक्विटीच्या रकमेचा देखील समावेश आहे. ठेवीदारांची ७१ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने भोसले यांच्या मालमत्तेवर गदा आणली होती.

दरम्यान, माजी आमदार अनिल भोसले यांनी ठेवीदारांच्या पैशांचा अपहार करुन फसवणूक केली होती. बनावट कर्ज प्रकरणे मंजूर केली होती. ठेवीदारांचे पैसे त्यांनी अन्यत्र वळविले होते, असे ईडीकडून कळविण्यात आले आहे.

माजी आमदार अनिल भोसले यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने जानेवारी महिन्याच्या सुरवातील फेटाळून लावला होता. हा निर्णय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. हिवसे यांनी दिला होता. तर याप्रकरणात आमदार भोसले यांची पत्नी रेश्मा भोसले या आरोपी असून त्या अजून फरारी आहेत. तसेच इतर १२ आरोपींना अद्याप अटक झाली नाही.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.