“खोताच्या बैलाला घो”,सदा खोत मुर्दाबाद” – “आधी बिल द्या मग ज्ञान पाजळा”, “खोताच्या बैलाला घो” पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे “जोडे मारो” आंदोलन,

Rokhthok Maharashtra 1 0

विधानपरिषदेचे माजी आमदार सदाभाऊ खोत हे सातत्याने देशाचे लोकनेते आदरणीय खा. शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करत आहेत. या गोष्टीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट असून आज पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांनी सदा खोत यांच्या फोटोला चप्पल व जोडे मारत आंदोलन केले. यावेळी “सदा खोत मुर्दाबाद” , “अगोदर बिल द्या…मग ज्ञान पाजळा”, “खोताच्या बैलाला घो”, अशा प्रकारच्या घोषणा देत बालगंधर्व रंग मंदिराचा परिसर दणाणून सोडला.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,”शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सेटलमेंट करत आमदारकी मिळविणाऱ्या सदा खोत नावाच्या आमदाराने आदरणीय पवारसाहेबांवर अतिशय घाणेरड्या भाषेत टीका केली आहे.
टाकलेला तुकडा संपत आला की पुन्हा तुकडा मिळावा यासाठी गेटकडे पाहून रखवालदारीचा आव आणणाऱ्या या प्रवृत्ती केवळ आमदारकीची टर्म संपत आल्याने अशी विधाने करत आहेत.

“आज सदा खोत यांच्या विरोधात आम्ही निषेध आंदोलन करत केले असलो, तरी भविष्यात जर अशा प्रकारची टीका टीपणी पुन्हा सदा खोत यांनी केली तर आम्ही त्यांच्या चेहऱ्याला काळेफासत त्यांच्या कृत्यांचा निषेध करू”, असा इशारा देखील प्रशांत जगताप यांनी दिला सदर आंदोलन प्रसंगी ज्येष्ठ नेते अंकुशअण्णा काकडे, प्रकाशआप्पा म्हस्के, काकासाहेब चव्हाण, उदय महाले, आप्पासाहेब जाधव, मृणालिनीताई वाणी, स्वातीताई पोकळे, प्रभावतीताई भुमकर, नितीनजी कदम, सुषमा सातपुते, किशोर कांबळे, रोहन पायगुडे, दीपक कामठे, आनंदजी सावणे, राजू साने, युसुफ शेख, मनोज पाचपुते, अनिताताई पवार, तन्वीर शेख, विविध सेलचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.