“”राहुल गांधींवर टिका करताना रावसाहेब दानवेंची जीभ घसरली” “अतिउत्साही रेल्वेमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली काम करणाऱ्या बैलाची उपमा”

Rokhthok Maharashtra 30 0

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची पुन्हा एकदा जीभ घसरली. दानवे यांनी राहुल गांधी यांच्यावर अतिशय खालच्या पातळीची टीका केली आहे. दानवे यांनी राहुल गांधी यांना बैलाची उपमा दिली आहे. “शेतीत दोन प्रकारचे बैल असतात. शेतीमध्ये दोन प्रकारचे बैल असतात. एक काम करणारा बैल आणि दुसरा काम न करणारा बैल असतो. सांड बैल हा न करणारा बैल असतो. देशात एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करतात. तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी काम करत नाही”, अशी टीका त्यांनी केली.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.