“बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याच्या  भट्टीवर छापा – ३४ हजार ४०० रुपये किंमतीचा मुददेमाल नष्ट – लोणी काळभोर पोलिसांची कारवाई”

Rokhthok Maharashtra 1 0

लोणी काळभोर दि. २०. ( वार्ताहर) स्वप्नील कदम
रोखठोक महाराष्ट्र न्यूज
                          येथील मुळा मुठा नदीच्या काठी बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याच्या  भट्टीवर छापा टाकून लोणी काळभोर पोलीसांनी कच्चे रसायन व तयार दारू असा एकुण ३४ हजार ४०० रुपये किंमतीचा मुददेमाल नष्ट करण्यात केला आहे. 

            पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे करणारे, तसेच शरीर व मालाविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करुन त्यांचे समुळ उच्चाटन करणे याबाबत पुणे शहरातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आदेश दिले आहेत.

             वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विजय जाधव यांना मंगळवार १९ ऑक्टोबर रोजी लोणी काळभोर ग्रामपंचायत हददीतील राहिंजवस्ती, येथील मुळा – मुठा नदीच्या काठी राधेशाम हरीराम प्रजापती हा बेकायदेशीर गावठी हातभटटीची दारु तयार करण्याची भटटी चालवित आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली. जाधव यांनी सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना दिली. त्यांनी पुढील कारवाईबाबत सुचना दिल्या. 

               त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेटटी, पोलीस हवालदार विजय जाधव, सुनिल शिंदे, श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, बाजीराव वीर या पथकाने सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारांस सदर  ठिकाणी छापा घातला. त्यावेळी तेथें  प्रजापती हा  जमिनीमधील खडयामध्ये गावठी हातभटटीची दारु तयार करण्याचे कच्चे रसायन लाकडी काठीने ढवळत असताना दिसला. पोलीस पथकाची चाहूल लागताच तो पळुन गेला. तेथे पाहणी केली असता पोलीसांना जमीनी मधील प्लास्टीक कागदाच्या खडयामध्ये गावठी हातभटटीची दारु तयार करण्याचे २००० लिटर कच्चे रसायन व ३५ लिटर मापाचे प्लॉस्टिकचे १२ कॅन्ड मध्ये प्रत्येकी ३५ लिटर गावठी हातभटटी तयार दारु असा एकुण ३४ हजार ४०० रुपये किंमतीचा माल मिळुन आला असुन. सदरचा माल जागीच नष्ट करण्यात आलेला आहे. .

          सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.