15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 5 तरुणांकडून सामूहिक बलात्कार, डोनजे येथील धक्कादायक घटना…

Rokhthok Maharashtra 1 0

प्रतिनीधी: स्वप्नील कदम.

पुणे : डोणजे तालुका हवेली येथे १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर ५ तरुणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२ दिवसापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील २ आरोपींना या गुन्ह्यातही सहभाग आहे. निलेश नेटके (वय- २१) लक्ष्मण पाटील (वय- २२) आणि इतर ३ अल्पवयीन सर्व राहणार डोणजे तालुका हवेली जिल्हा पुणे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असून यातील निलेश नेटके हा अटक असून लक्ष्मण पाटील फरार झाला आहे. २ दिवसामध्ये २ वेळा बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याने डोणजे परिसरातील पालक आणि शिक्षकांनी चिंता व्यक्त केली आहे.हवेली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार करून त्याचे व्हिडिओ तयार केले होते. घडलेल्या प्रकाराविषयी वाच्यता केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीला आणि तिच्या आईला महिला पोलिस अधिकाऱ्यांनी विश्वासात घेतल्यानंतर पीडित मुलीने याविषयी माहिती दिली आहे.त्यानुसार हवेली पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील आणि हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.