‘कॉकरोच जनता पार्टी’ संस्थापकाला जीवे मारण्याच्या धमक्या! अभिजीत दीपके यांनी शेअर केले धक्कादायक स्क्रीनशॉट

Rokhthok Maharashtra 20 0

“सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
दीपके यांनी स्वतः सोशल मीडियावर अनेक स्क्रीनशॉट आणि व्हिडीओ शेअर करत हा प्रकार उघड केला आहे.
केवळ त्यांनाच नाही, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाही धमक्या दिल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये एक तरुण थेट इशारा देताना दिसत असून,
‘कॉकरोच जनता पार्टीची झुरळं चिरडली जातील,’ अशी भाषा वापरली गेली आहे.
दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी दीपके यांच्या कुटुंबाला सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.
याचबरोबर दीपके यांनी त्यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याचाही आरोप केला आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.