चिंताजनक! कोरोना काळातील स्टेरॉयडमुळे तरुणांचे हिप बोन डॅमेज?

Rokhthok Maharashtra 26 0

कोरोना गेला… पण त्याची भीती अजून संपलेली नाही!
आता समोर आलाय एक धक्कादायक धोका… कोविडमध्ये घेतलेल्या स्टेरॉयड औषधांमुळे तरुणांमध्ये हिप बोन म्हणजेच बसण्याच्या जागेवरील हाड खराब होण्याच्या केसेस वाढत आहेत.
दिल्लीमध्ये झालेल्या DELHI HIP 360 Conference मध्ये डॉक्टरांनी गंभीर इशारा दिला आहे. ३० ते ४० वर्षांच्या तरुणांमध्ये AVN म्हणजे Avascular Necrosis हा आजार झपाट्याने वाढतोय.
या आजारात हिप बोनपर्यंत रक्तपुरवठा कमी होतो… आणि हळूहळू हाड कमजोर होऊन डॅमेज होतं.
सुरुवातीला काय लक्षणं दिसतात? चालताना वेदना… लंगडत चालणं… कंबर आखडणं… उठण्या-बसण्यात त्रास…
पण अनेक जण याकडे सामान्य दुखणं म्हणून दुर्लक्ष करतात. आणि टेस्ट होईपर्यंत हाडाचं मोठं नुकसान झालेलं असतं.
डॉक्टरांचं म्हणणं आहे… कोविड काळात स्टेरॉयड औषधांनी अनेकांचे जीव वाचवले… पण काही ठिकाणी जास्त प्रमाणात आणि जास्त काळ वापर झाल्याने आता त्याचे साईड इफेक्ट समोर येत आहेत.
सगळ्यात धक्कादायक म्हणजे… कोविडनंतर Hip Replacement Surgery च्या केसेसमध्ये तब्बल ४० टक्के वाढ झाली आहे!
म्हणूनच… जर तुम्हाला सतत कंबर, मांड्या किंवा हिपमध्ये वेदना होत असतील… तर दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या… कारण वेळ गेल्यावर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय उरत नाही.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.