“जितेंद्र सोनवणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त, पुणे महानगरपालिका, प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने सन्मान

Rokhthok Maharashtra 2 0

हडपसर, पुणे येथील मनपा शाळा क्रमांक 12 बी येथे शिक्षक म्हणून कार्यरत असणारे व मूळचे कळमडू, ता. चाळीसगाव जि. जळगाव येथील उपक्रमशील शिक्षक जितेंद्र साहेबराव सोनवणे यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना पुणे महानगरपालिका, प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५- २६ करिता आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सदर पुरस्कार नवल किशोर राम आयुक्त तथा प्रशासक, पुणे महानगरपालिका यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे दि.९ सप्टेंबर २०२५ रोजी वितरित करण्यात आला. या पुरस्कार वितरण समारंभासाठी वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे, एम. जे प्रदिप चंद्रन (अतिरिक्त मनपा आयुक्त ज.)विजयकुमार थोरात उपायुक्त शिक्षण विभाग, तसेच शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे आदि मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्कारासाठी मनपा कार्यक्षेत्रातील प्राथमिक शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १५ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील १० व खाजगी प्राथमिक शाळांमधील ५ शिक्षकांचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी एकूण ५६ अर्ज ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाले होते. शासनाने ठरवलेल्या निकषानुसार निवड समितीने दस्तऐवजांची तपासणी, मुलाखत व वर्ग भेटीच्या आधारे गुणवत्तेनुसार शिक्षकांची निवड केली.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.