जेलमधून बाहेर येताच विशाल अग्रवाल कुटुंबाची जंगी पार्टी? Viral Video वर संताप!

Rokhthok Maharashtra 2 0

पुण्यातील बहुचर्चित कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय… आणि यावेळी कारण आहे एक व्हायरल व्हिडिओ!
या व्हिडिओमध्ये बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल आणि त्यांच्या पत्नी गळ्यात नोटांचे हार घालून पार्टी करताना दिसत आहेत. “मुंबई से आया मेरा दोस्त…” या गाण्यावर संपूर्ण कुटुंब जल्लोषात नाचताना दिसतंय.
याच अग्रवाल कुटुंबाच्या अल्पवयीन मुलाने भरधाव पोर्शे कारने दोन आयटी इंजिनिअर्सचा जीव घेतल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त झाला होता. रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार, ससूनमधील डॉक्टरांवर कारवाई आणि पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित झाले होते.
आता जेलमधून बाहेर आल्यानंतर झालेल्या कथित पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर संतापाची नवी लाट उसळली आहे. “पैशांचा माज अजून उतरलेला नाही”, “न्याय व्यवस्थेची खिल्ली उडवली जातेय का?” असे सवाल नेटकरी विचारत आहेत.
दरम्यान, मृत तरुणांच्या कुटुंबीयांना अजूनही न्यायाची प्रतीक्षा आहे… आणि त्यामुळे हा व्हिडिओ आणखी वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.