डोळा मारून फ्लाईंग किस का केला असे विचारताच महिलेच्या पतीला मारहाण, हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा

Rokhthok Maharashtra 29 0

पुणे : रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेला डोळा मारून फ्लाईंग किस करुन हाताने इशारे केले. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पतीला शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत वणवे (वय ४०, रा. हडपसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. हा प्रकार हडपसर परिसरातील लक्ष्मी कॉलनी येथे बुधवारी (दि. १३ मार्च) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्य़ादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे असून, एकाच परिसरात राहतात. बुधवारी (दि. १३ मार्च) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास महिला रस्त्याने जात होती. त्यावेळी आरोपी गल्लीमध्ये उभोता, त्याने महिलेकडे पाहून डोळा मारला. तसेच, फ्लाईंग किस करुन हातवारे केले. याबाबत महिलेने तिच्या पतीला सांगितले. महिला आणि तिचे पती याबाबत विचारणा करण्यासाठी आरोपीच्या घरी गेले. त्यावेळी प्रशांत वणवे व त्याच्या पत्नीने फिर्य़ादी यांच्या पतीला शिवीगाळ केली. तसेच हाताने मारहाण केली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.