पुण्यात राष्ट्रवादीत बंड? शहराध्यक्ष सुभाष जगताप अडचणीत!

Rokhthok Maharashtra 2 0

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अंतर्गत नाराजी उफाळून आल्याची चर्चा रंगली आहे. पुणे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावरून आधीच वाद सुरू असताना आता शहराध्यक्ष सुभाष जगताप यांच्या विरोधातच पक्षात बंड पुकारण्यात आल्याचं समोर आलं आहे.
पक्षाचे कार्याध्यक्ष रामदास गाडे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा Sunetra Pawar यांच्याकडे तक्रार करत जगताप यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या वर्षभरात पश्चिम भागाची शहर कार्यकारिणी जाहीर न केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पर्वती, खडकवासला, कोथरूड आणि शिवाजीनगर या चार विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सुभाष जगताप यांच्याकडे आहे. मात्र, अजूनही कार्यकर्त्यांना पदे आणि जबाबदाऱ्या न मिळाल्याने नाराजी वाढत असल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे पूर्व भागाचे शहराध्यक्ष Sunil Tingre यांनी कार्यकारिणी जाहीर करून कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. त्यामुळे पश्चिम भागातील कार्यकर्ते अधिक नाराज झाल्याचं बोललं जात आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेलं हे अंतर्गत राजकारण पक्षासाठी डोकेदुखी ठरणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.