बारामती हादरली! भरतीचे आमिष दाखवत दोन पोलिसांवर अत्याचाराचा गुन्हा

Rokhthok Maharashtra 127 0

पुणे जिल्ह्यातील बारामतीतून पोलीस भरती करून देण्याचे आमिष दाखवत दोन पोलिसांनी एका तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला असून, न्यायालयाच्या आदेशानंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ कुंभार आणि मुंबई पोलीस बँड पथकातील हवालदार मारुती करे यांनी संबंधित तरुणीला पोलीस दलात किंवा बँड पथकात भरती करून देण्याचे आश्वासन दिले. या विश्वासाचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
पीडित तरुणीने सुरुवातीला पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, तक्रारीची दखल न घेतल्याचा आरोप करत तिने थेट न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. आरोप सिद्ध होईपर्यंत आरोपींना दोषी मानले जाऊ शकत नाही.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.