भोंदूबाबाचा काळा कारनामा! 35 जोडप्यांचे खासगी व्हिडिओ पेनड्राइव्हमध्ये; तपासात धक्कादायक खुलासा

Rokhthok Maharashtra 3 0

नाशिकमधील कथित भोंदूबाबा राधामोहन मिश्रा प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिसांनी आश्रमातून जप्त केलेल्या २३ पेनड्राइव्हच्या तपासात तब्बल ३५ जोडप्यांचे खासगी व्हिडिओ सापडल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक तपासानुसार, महिला भक्तांना त्यांच्या पतींसोबतच्या खासगी क्षणांचे चित्रीकरण करून ते पेनड्राइव्हद्वारे बाबाकडे पाठवण्यास भाग पाडले जात होते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आश्रमातून १२ लॅपटॉप, ११ मोबाईल, १९ हार्डडिस्क, २३ पेनड्राइव्ह, लाखोंची रोकड, दागिने आणि जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.
यापूर्वी एका महिला अभियंत्याने मिश्रा याच्यावर तब्बल १७ वर्षे मानसिक, आर्थिक आणि लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला होता.
इतकेच नाही, कारवाईची चाहूल लागताच आश्रमातून पळून जाण्यासाठी भुयार खोदण्याचे नियोजनही सुरू असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
या प्रकरणातील आणखी धक्कादायक खुलासे पुढे येण्याची शक्यता असून पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.