मसाजच्या नावाखाली 61 महिलांवर अत्याचार! भारतीय थेरपिस्टचा ऑस्ट्रेलियात घाणेरडा खेळ

Rokhthok Maharashtra 15 0

ऑस्ट्रेलियातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय… दिल्लीहून ऑस्ट्रेलियात गेलेल्या एका भारतीय थेरपिस्टने मसाजच्या नावाखाली तब्बल 61 महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालंय.
सुमित रस्तोगी असं या आरोपीचं नाव असून, तो 2011 मध्ये ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला होता. पण 2021 ते 2022 या अवघ्या नऊ महिन्यांत त्याने महिलांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत घाणेरडे प्रकार सुरू केले.
उपचार आणि मानसिक स्थैर्यासाठी आलेल्या महिलांसोबत तो अश्लील चाळे करत होता. इतकंच नाही… काही महिलांचे गुप्त व्हिडीओ तयार करून त्यांना ब्लॅकमेल करत अत्याचार केल्याचे आरोपही त्याच्यावर आहेत.
धक्कादायक म्हणजे… या व्यक्तीकडे मसाज थेरपीचं कोणतंही अधिकृत शिक्षण किंवा परवाना नव्हता.
न्यायालयात सुनावणीदरम्यान त्याने तब्बल 97 आरोप मान्य केले… आणि आता कोर्टाने त्याला 13 वर्षे 10 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
शिक्षेनंतर त्याला ऑस्ट्रेलियातून हद्दपार करण्याचीही शक्यता व्यक्त केली जातेय.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.