मुंढव्यात गोयल गंगा प्रोजेक्टचा नागरिकांवर जलप्रहार? घरात घुसलं पाणी, PMC कारवाईची मागणी!

Rokhthok Maharashtra 4 0

पुण्यातील मुंढवा परिसरातील जाधव नगर येथील नागरिक सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. हडपसर रेल्वे स्टेशनजवळ सुरू असलेल्या एका मोठ्या कमर्शियल प्रोजेक्टमुळे परिसरात अक्षरशः पूरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून, रस्ते जलमय झाले आहेत. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण? पाहूया या 
“स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, सर्वे नंबर ६२ येथील गोयल गंगा कंपनीच्या कमर्शियल प्रोजेक्टमध्ये सध्या पाया खोदण्याचे काम सुरू आहे. या खोदकामादरम्यान जमिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर येत असून, पावसाचे पाणी देखील खड्ड्यात साचत आहे.
मात्र हे पाणी योग्य पद्धतीने व्यवस्थापित करण्याऐवजी थेट सार्वजनिक रस्त्यावर आणि ड्रेनेज लाईनमध्ये सोडले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे जाधव नगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाल्याचे नागरिक सांगत आहेत.”
“परिसरातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्यामुळे शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो झाल्याने दुर्गंधी पसरली असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे.”
“विशेष म्हणजे, नागरिकांनी प्रकल्प व्यवस्थापनाकडे अनेकदा तक्रार केली. मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.”

 

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.