रातोरात पुतळे, सकाळी दंगल! सोलापूरमध्ये मोठं षडयंत्र उघड | Statue Controversy

Rokhthok Maharashtra 20 0

राज्यात सामाजिक सलोखा बिघडवण्याचा एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
रात्रीच्या अंधारात गावात पुतळे उभारायचे… आणि सकाळी त्यावरून वाद निर्माण करून दंगल पेटवायची — असा भयानक प्लॅन या टोळीचा होता.
या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार बाळराजे आवारे पाटील सोलापूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

सोलापूर, बीड, परभणी, बुलढाणा आणि यवतमाळमध्ये अशाच प्रकारच्या घटना घडल्याचा आरोप आहे.
ही टोळी आधी सोशल मीडियावर वातावरण तयार करायची…
नंतर तरुणांना भडकवून विनापरवाना पुतळे बसवायला लावायची…
२५ हजाराचा पुतळा १ लाखाला विकून आर्थिक फायदाही घेतला जात होता.
या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली असून, यामागे मोठं राजकीय षडयंत्र आहे का? याचा तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.