“वनउद्यानात आग… सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!”…नगरसेविका उज्ज्वला जंगले संतप्त!”

Rokhthok Maharashtra 2 0

पुण्यातील हडपसर–काळेपडळ परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील नागरी वनउद्यानातील लाकडी पॅगोडा अज्ञात व्यक्तींनी जाळल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली.
सकाळी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी तात्काळ नगरसेविका उज्ज्वला सुभाष जंगले यांना माहिती दिली. या आगीत पॅगोडाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संपूर्ण रचना जळून खाक झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी करून तपास सुरू केला असून हा प्रकार जाणीवपूर्वक घडवून आणला का, याची चौकशी सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अज्ञातांनी पॅगोडा पेटवून दिल्याने तो पूर्णपणे नष्ट झाला असून याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, या उद्यानात मद्यपान व नशा करणाऱ्यांचा वावर असल्याबाबत स्थानिकांनी यापूर्वीही तक्रारी केल्या होत्या. तरीही त्यावर नियंत्रण आले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
दोषींना लवकरात लवकर शोधून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
यासंदर्भात नगरसेविका उज्ज्वला सुभाष जंगले यांनीही दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.