हडपसरमध्ये तरुणावर दगडाने जीवघेणा हल्ला; चार जणांविरोधात गुन्हा

Rokhthok Maharashtra 3 0

पुण्यातील हडपसर परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडीतळ परिसरातील व्हीआयपी गार्डनसमोर एका 21 वर्षीय तरुणावर दगडाने हल्ला करून मारहाण करण्यात आल्याची तक्रार हडपसर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
पीडित तरुण वैजेनाथ भिसे हा आपल्या मित्रांसोबत आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधून पैसे काढून बाहेर पडत असताना अचानक त्याच्या डोक्यात दगड फेकून मारण्यात आला. त्यानंतर काही तरुणांनी मिळून त्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या हल्ल्यात वैजेनाथ गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला टाके पडले आहेत. तसेच हातालाही दुखापत झाली आहे. मित्रांनी त्याला तात्काळ हडपसर पोलीस ठाण्यात नेले, त्यानंतर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले.
या प्रकरणी ओम वाडेकर, सार्थक वाडेकर, ओंकार जाधव आणि स्वप्नील धोत्रे यांच्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. प्रत्यक्षात कोयत्याने हल्ला केल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे परंतु पोलिसांनी दगडाने जखमी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हडपसर परिसरात कोयता बँक चा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून पोलिसांना या कोयताग्यांच्या गुन्हेगारावर अंकुश बसविण्यास अपयश येत आहे.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.