हॉस्पिटलमध्ये बॉम्ब का ठेवला? आरोपीने ATS समोर केला धक्कादायक खुलासा

Rokhthok Maharashtra 2 0

पुण्यातल्या हडपसरमधील हॉस्पिटलमध्ये सापडलेल्या टायमर बॉम्ब प्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे!
पोलिस आणि ATS ने या प्रकरणातील आरोपी शिवाजी राठोड याला नागपूर रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतलं आहे.
आणि चौकशीत त्याने दिलेली माहिती ऐकून पोलीसही हादरले!
राठोडने कबूल केलं की हॉस्पिटल व्यवस्थापनातील काही कर्मचाऱ्यांसोबत त्याचा वाद झाला होता.
त्याच संतापातून त्याने हॉस्पिटलमध्ये ७ तासांचा टायमर लावून बॉम्ब ठेवला.
धक्कादायक म्हणजे…

गुन्हा केल्यानंतर तो थेट बंगालमार्गे बांगलादेशकडे पळून जाण्याच्या तयारीत होता!
पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने देशातील वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनची तिकिटं काढली होती.
मात्र ATS ने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे नागपुरात त्याला पकडलं.
सध्या आरोपीची कसून चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू आहे.
एका छोट्या वादातून एवढं मोठं पाऊल उचललं गेलं…
आणि त्यामुळे संपूर्ण पुणे हादरलं!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.