पुणे

Rokhthok_Big_Breking_News “या” घटनेने पुणे जिल्ह्यात खळबळ पुणे जिल्ह्यातील एका पोलिस पाटीलावर गोळीबार !

पुणे जिल्ह्यात पोलिस पाटीलावर गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. रविवारी दुपारी ही घटना खेड तालुक्यातील वरची भांबुरवाडी येथे घडली आहे. यात पोलीस पाटील जखमी झाले आहेत. सुदैवाने गावठी कट्टा लॉक झाल्याने पोलीस पाटील बचावले आहेत.
सचिन भिवसेन वाळुंज (वय ३५ ) असे या गोळीबारात जखमी झालेल्या पोलीस पाटलांचे नाव आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात सौरभ अनिल ढोरे, विपुल भिमाशंकर थिगळे, अतुल ऊर्फ बंटी काळूराम भांबुरे हे सर्व (रा. वरची भांबुरवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस पाटील सचिन वाळुंज याना रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ठेकेदार संजय कौटकर यांचा फोन आला होता. त्यांना , ‘पाण्याची टाकीच्या कामानिमित्त बोलाविले. त्यावेळी सचिन वांळूज हे त्यांच्या कारमधून गेले होते. येथे कौटकरसोबत आलेले मित्र व वाळुंज यांच्यामध्ये चर्चा सुरू होती.
त्यावेळी दबाधरून बसलेल्या आरोपींनी गोळीबार केला. पण, फटाक्यासारखा आवाज आल्यानंतर पाहिले असता सचिन वाळुंज हातातुन रक्त वाहत होते. तर समोर सौरभ ढोरे यांने वाळुंज यांच्या वरती गावठी कट्टा रोखला होता मात्र तो फायर झाला नाही. दरम्यान वाळूंज यांनी तेथून पळ काढला. त्याच्या पाठीमागे सौरभ ढोरे, विपुल थिगळे व अतुल भांबुरे यांनी मागे पळून दगड मारले.
वाळूंज हे थेट त्याच्या चारचाकीमध्ये बसून थेट राजगुरुनगर येथील एका खाजगी रुग्णालयात आले. त्यांच्या उजवा हाताच्या मनगटाला गोळी लागली असुन हाड फॅक्चर झाले आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेने खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. वाळुंज यांच्यावर राजकिय वादातुन गोळीबार झाला आहे अशी चर्चा आहे.

Comment here