पिंपरी-चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांचा करोनामुळे मृत्यू : करोना महामारीत अनेकांना केली होती मदत

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक आणि महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पहिल्यांदा करोना विषाणूची सौम्य लक्षण होती. मात्र, त्यांनानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. या दुःखद घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक आणि महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांनी करोना विषाणुच्या संकट काळात अनेक नागरिकांना मदत केली होती. अनेक गरीब आणि गरजू व्यक्तींना त्यांनी धान्य वाटप केले. दरम्यान, त्यांना २५ जून रोजी करोना विषाणुची बाधा झाल्याचं स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु आज सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Comment here