कदमवाक् वस्ती येथील रेल्वे स्टेशन परिसरात ६०८ ग्रॅम गांजासह तस्कर जेरबंद; लोणी काळभोर पोलिसांची धडक कारवाई

Rokhthok Maharashtra 2 0

लोणी काळभोर, ता. १ :कदमवाक् वस्ती येथील लोणी रेल्वे स्टेशन परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी मंगळवारी (ता. ३०) सायंकाळी सुमारे पावणे आठ वाजण्याच्या सुमारास धडक कारवाई केली आहे . या छाप्यात पोलिसांनी ६०८ ग्रॅम गांजासह एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ३६ हजार रुपयांचा गांजा आणि ५ हजार रुपयांचा मोबाईल, असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अमिरखान सुदाखान पठाण (वय ५०, रा. विश्वराज हॉस्पिटल शेजारी, लोणी स्टेशनजवळ, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई अशोक भागवत गिरी यांनी सरकारतर्फे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विशेष म्हणजे या आधी आरोपीचा भाऊ शेरखान सुधाखान पठाण यास अमली पदार्थ विक्री कायद्यांतर्गत पुणे जिल्ह्यातून २ वर्ष तडीपार करण्यात आले आहे. कायद्याची कुठलीही भीती नसणारे बरेचजन लोणी कदमवस्ती स्टेशन परिसरात अमली पदार्थाचा व्यवसाय करत असल्याचे जनते मध्ये बोलले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वराज हॉस्पिटलसमोर, लोणी रेल्वे स्टेशनजवळील रस्त्याच्या कडेला आरोपी अमिरखान पठाण हा संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या ६०८ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला.

आरोपी अमिरखान पठाण याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायदा कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) अन्वये लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.