कॉमन गर्लफ्रेंडच्या वादातून मित्राचा खून; पुणे हादरलं!

Rokhthok Maharashtra 17 0

पुण्यातील गोखलेनगर परिसरात मैत्री, प्रेम आणि सूड यांचं धक्कादायक रूप समोर आलं आहे.
कॉमन गर्लफ्रेंडच्या वादातून मित्रांनीच मित्राचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणात हर्ष मच्छिंद्र जाधव, वय २३, याचा मृत्यू झाला आहे. हर्ष आणि आरोपी अभिषेक पवार, प्रथमेश धोत्रे आणि माऊली देवकर हे चौघेही जवळचे मित्र होते. मात्र, एका तरुणीवरून गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरू होता.दोन दिवसांपूर्वी हर्षने दारूच्या नशेत मित्राच्या घरी जाऊन राडा घातल्याचा आरोप आहे. त्याचाच राग मनात ठेवून आरोपींनी कट रचत हर्षवर बेसबॉल स्टिकने हल्ला केला.
गंभीर जखमी झालेल्या हर्षचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. मात्र, चतुःशृंगी पोलिसांनी नवी मुंबईतून तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.