“घुले वस्तीमध्ये कचऱ्याला आग! मोठे स्फोट, महावितरणचं नुकसान”

Rokhthok Maharashtra 17 0

पुण्यातील घुले वस्ती, मांजरी बुद्रुक परिसरात काल रात्री मोठी आग लागल्याची घटना समोर आली आहे…
मांजरी बुद्रुक येथील कॅनॉललगत कचरा आणि राडारोड्यात रात्री 8 च्या सुमारास अचानक आग भडकली…आगीसोबत काही स्फोटही झाले… त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं…
या आगीत महावितरणच्या लघुदाब विजवाहिन्यांचं मोठं नुकसान झालं आह

घटनेची माहिती मिळताच समर्पण प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले… त्यानंतर महावितरण कर्मचाऱ्यांना बोलावून ट्रान्सफॉर्मर आणि वीज पुरवठा तातडीने बंद करण्यात आला…
अग्निशमन दलालाही संपर्क साधण्यात आला… आणि अवघ्या 15 मिनिटांत गाडी घटनास्थळी दाखल झाली… जवळपास अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात यश आलं…
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही…
मात्र, कचरा आणि राडारोडा टाकण्याच्या बेजबाबदारपणामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे…

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.