“दारूसाठी पैसे देण्यावरुन झालेल्या हाणामारीत अल्पवयीन मुलांकडून गुंडाचा दगडाने ठेचून खून – रामटेकडी परिसरातील घटना, आरोपी अटकेत…

Rokhthok Maharashtra 2 0

पुणे : दारूसाठी पैसे देण्यावरुन झालेल्या हाणामारीत अल्पवयीन मुलांनी गुंडाचा दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे ही घटना रामटेकडी परिसरातील वंदेमातरम चौकात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

 

राजू शिवशरण (वय ३६, रा. रामटेकडी, हडपसर) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. वानवडी पोलीस ठाण्यात राज शिवशरण याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
याप्रकरणी निखिल कैलास चव्हाण (वय १६, रा. वंदेमातरम चौक, रामटेकडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशरण आणि महेश शिंदे, नितीन पाटोळे, अरविंद माने, चेतन बावरी, दुर्गेश बल्ल्या गायकवाड हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.

 

दारू पिऊन ते शुक्रवारी मध्यरात्री दीड वंदेमातरम चौकात थांबले होते. त्यावेळी दारु पिण्यास मुलांनी राजूकडे पैसे मागितले. त्याने नकार दिल्याने त्यांच्यात वादावादीला सुरुवात झाली. शिवशरण याने शिवीगाळ केल्याच्या रागातून मुलांनी त्याला वीट, दगड, सिमेंटचे तुकडे लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यांच्यातील एकाने शिवशरण याच्या डोक्यात दगड घातला तर, दुसर्‍याने डोक्यात दारुची बाटली फोडली.
फिर्यादी आपल्या मामाला वाचविण्यास गेलेल्या फिर्यादीच्या डोक्यात महेश शिंदे याने बाटली मारुन जखमी केले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शिवशरण याला पोलिसांनी ससून रुग्णालयात नेले.
परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यु झाला होता.
वानवडी पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असल्याचे पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.