पार्थ पवारांचीच पॉवर? राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा सस्पेन्स संपला!

Rokhthok Maharashtra 2 0

पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा सस्पेन्स अखेर संपल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक दिग्गज इच्छुकांना मागे टाकत विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या निर्णयामागे खासदार पार्थ पवार यांची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
माजी आमदार सुनील टिंगरे, विलास लांडे, योगेश बहल, दीपक मानकर, नाना काटे यांच्यासह अनेक दिग्गज नेते शर्यतीत होते. मात्र अखेर विक्रम काकडे यांच्या नावाला पसंती मिळाल्याचे समोर आले आहे.
विक्रम काकडे हे उद्योजक असून माजी खासदार संजय काकडे यांचे सुपुत्र आहेत. तसेच ते पार्थ पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.
आता या निर्णयानंतर पुण्याच्या राजकारणात नवीन समीकरणे कशी जुळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.