नगरसेवक अजित आबा घुले यांचा महादेव नगर दौरा | नागरिकांच्या समस्या ऐकून दिले तातडीच्या कारवाईचे आश्वासन

Rokhthok Maharashtra 1 0

प्रभाग क्रमांक 15 चे नगरसेवक अजित आबा घुले यांनी आज महादेव नगर परिसरातील विविध भागांना भेट देत नागरिकांशी थेट संवाद साधला. हरी ओम कॉलनी, सुरज हॉस्पिटल कॉलनी, दत्त कॉलनी, चैतन्य कॉलनी, जय भवानी कॉलनी आणि युथ क्लब कॉलनी या भागांमध्ये जाऊन त्यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी नागरिकांनी पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, रस्त्यांवरील दिवे, स्वच्छता तसेच इतर नागरी सुविधांबाबतच्या अडचणी नगरसेवकांसमोर मांडल्या. नागरिकांच्या सूचनाही ऐकून घेण्यात आल्या. संबंधित प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली असून संबंधित विभागांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन नगरसेवक अजित आबा घुले यांनी दिले.
प्रभागातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम, दर्जेदार आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी नागरिकांना दिली.
दरम्यान, माजी ग्रामपंचायत सदस्य मंदाकिनी महेश नलावडे यांनी माहिती देताना सांगितले की, महादेव नगर परिसरातील उर्वरित भागांमध्येही नगरसेवक अजित आबा घुले हे पुढील आठ दिवसांत भेट देणार आहेत. नागरिकांच्या प्रत्यक्ष समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य नियोजन करण्यात येणार असून त्यासाठी स्वतंत्र दौऱ्याचे नियोजन केले जाणार आहे.
नागरिकांच्या प्रश्नांसाठी लोकप्रतिनिधी स्वतः मैदानात उतरून संवाद साधत असल्याने स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.