पुण्यात देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश! कॉलेजजवळ लॉजवर छापा, 4 तरुणींची सुटका

Rokhthok Maharashtra 26 0

पुण्यातील पुणे शहरात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नऱ्हेगाव परिसरात, एका नामांकित कॉलेजजवळ सुरू असलेल्या देहविक्री रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने ‘स्वर्ग एक्झिक्युटिव्ह पॅराडाईज लॉज’वर छापा टाकला.

या कारवाईत 4 तरुणींची सुटका करण्यात आली असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
अटक आरोपींवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.