घटस्फोटित मुलीचं बँड-बाजात स्वागत! वडिलांचा समाजाला मोठा संदेश |

Rokhthok Maharashtra 2 0

समाजात घटस्फोट म्हणजे आजही कलंक मानला जातो…
पण मेरठ मधून समोर आलेली ही घटना हा विचार बदलणारी आहे.
निवृत्त न्यायाधीश ज्ञानेंद्र कुमार यांनी आपल्या मुलीचं—प्रणिता वशिष्ठ—घरी बँड-बाजा लावून जंगी स्वागत केलं. 2018 मध्ये तिचं लग्न एका आर्मी मेजरसोबत झालं होतं. पण लग्नानंतर तिला मानसिक, शारीरिक आणि भावनिक त्रास सहन करावा लागला.

अखेर तिने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला… आणि न्यायालयाने तिच्या बाजूने निर्णय दिला. घरी परतल्यानंतर तिचं ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं.
वडिलांनी स्वतः फुलांचा हार घालून तिला मिठी मारली आणि समाजाला एक ठाम संदेश दिला—
“घटस्फोट म्हणजे अपयश नाही… मुलींचा सन्मान आणि आनंद सर्वात महत्त्वाचा!”
ही घटना समाजातील जुन्या विचारांना आव्हान देणारी ठरत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.