भाजपच्या नगरसेविका किरण जठार यांचे नगरसेवक पद रद्द आयुक्त सौरभ राव यांचे आदेश

Rokhthok Maharashtra 27 692

रोखठोक महाराष्ट्र न्युज….
पुणे : (प्रतिनिधी) –
महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर कळस धानोरी या प्रभाग क्रमांक एकमधून विजयी झालेल्या नगरसेविका किरण जठार यांचे नगरसेवक पद आज रद्द करण्यात आले. पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश आज काढले आहेत.

महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधील अ गटातून (अनुसूचित जाती) या आरक्षित जागेवर किरण जठार यांनी निवडणूक लढवली. निवडणुकीचा अर्ज दाखल करताना त्यांनी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) कार्यालयाकडून जातीचा दाखला मिळविला होता. हा दाखला मिळविण्यासाठी सादर केलेल्या अर्जासोबत त्यांनी १९५० पूर्वीचा जातीचा पुरावा म्हणून आजोबा लक्ष्मण गंगाराम कसबे यांचा पुणे महापालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेचा दाखला जोडला होता. या जातीच्या दाखल्याच्या आधारे जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज सादर केला.

हा दाखला बनावट असल्याची तक्रार हुलगेश चलवादी, दिलीप ओरपे आणि रेणुका चलवादी यांनी जिल्हा प्रमाणपत्र जात पडताळणी समितीकडे केली होती.

4 1 vote
Article Rating
692 Comments
Oldest
Newest Most Voted

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.