“मी पुन्हा मारणार नाही…” विश्वास ठेवून घरी आली; लिव्ह-इन पार्टनरनेच केली निर्घृण हत्या

Rokhthok Maharashtra 3 0

कल्याणजवळील आंबिवली परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. “मी तुला पुन्हा कधीच मारणार नाही,” या शब्दांवर विश्वास ठेवून घरी परतलेल्या २२ वर्षीय तरुणीची तिच्याच लिव्ह-इन पार्टनरने निर्घृण हत्या केली.
सारिका उर्फ रुक्सार असं मृत तरुणीचं नाव असून, सतीश उर्फ गुड्डू वाघे असं आरोपीचं नाव आहे. दोघे गेल्या दोन-तीन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र आरोपी सतत तिच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण करत होता.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीमुळे रुक्सार आई-वडिलांकडे गेली होती. पण “आता पुन्हा हात उचलणार नाही” असं सांगून आरोपीने तिला पुन्हा घरी बोलावलं.
मात्र पहाटे पुन्हा दोघांमध्ये वाद झाला आणि संतापाच्या भरात आरोपीने आधी काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर घरातील टीव्ही आणि पाण्याने भरलेला तांब्याचा हंडा तिच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केलं.
रुग्णालयात नेत असताना रुक्सारचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपी रुग्णालय परिसरातच फिरताना दिसताच संतप्त नातेवाईकांनी त्याला पकडून मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून टिटवाळा पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.