हडपसरमध्ये पुन्हा गुंडगिरी! माळवाडी केशव चौकात 6 गाड्यांची तोडफोड, नागरिक संतप्त

Rokhthok Maharashtra 16 0

पुण्यातील हडपसर परिसरातील माळवाडी केशव चौकात पुन्हा एकदा गुंडगिरीचा प्रकार समोर आला आहे. मध्यरात्री एका युवकाने तब्बल पाच ते सहा वाहनांची तोडफोड करून मोठे नुकसान केल्याची घटना घडली आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या दोन महिन्यांपूर्वी याच परिसरात वाहनांना आग लावण्याचा प्रकार घडला होता. आता पुन्हा वाहनांची तोडफोड झाल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर नगरसेवक प्रशांत मामा तुपे यांनी हडपसर पोलिसांची भेट घेत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच परिसरातील अवैध धंदे तात्काळ बंद करून गुन्हेगारांवर आळा घालण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इप्पर यांनी या प्रकरणातील आरोपींवर तातडीने कारवाई केली जाईल, तसेच नागरिकांनी घाबरून न जाता तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन केले आहे.
विषारी दारू प्रकरण, कोयता गँग आणि वाढत्या अवैध व्यवसायांमुळे हडपसर परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, पोलिसांनी कठोर पावले उचलावीत अशी मागणी जोर धरत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.