| हॉस्पिटलमध्ये जिवंत बॉम्ब! CCTV मधील तरुण म्हणाला “तो मीच पण…”

Rokhthok Maharashtra 10 0

पुण्यातल्या हडपसरमध्ये हॉस्पिटलमध्ये सापडलेल्या जिवंत बॉम्ब प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आलाय!
सीसीटीव्हीत दिसलेला संशयित तरुण स्वतः पोलिसांसमोर हजर झाला… आणि म्हणाला —
“व्हिडीओमध्ये दिसणारा मीच आहे… पण माझा बॉम्बशी काही संबंध नाही!”
पोलिस तपासात समोर आलं की हा तरुण मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असून औषधांच्या कामासाठी नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये आला होता.
दरम्यान हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये सापडलेल्या या बॉम्बसदृश वस्तूवर दोन पाईप, वायर आणि टायमर होता.
सर्वात धक्कादायक म्हणजे त्यावर तब्बल ७ तासांचा टायमर सेट करण्यात आला होता!
बॉम्बशोधक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बॉम्ब ताब्यात घेतला.
पण आता मोठा प्रश्न असा —
खरा आरोपी कोण?
आणि हॉस्पिटलचं टार्गेट का करण्यात आलं?
सध्या पुणे पोलिस आणि ATS या प्रकरणाचा प्रत्येक अँगलने तपास करतायत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.