हॉस्पिटल बॉम्बचे धागेदोरे मांजरीत? ATS आणि पोलिसांचे मोठे छापे

Rokhthok Maharashtra 1 0

हडपसरच्या उषाकिरण हॉस्पिटलमध्ये सापडलेल्या बॉम्ब प्रकरणात आता तपासाचे धागेदोरे थेट मांजरीपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येतेय!
मांजरीतील घावटे वस्ती परिसरात एका मोबाईल शॉपवर पोलिसांनी आणि ATS ने उशीरा रात्री छापा टाकला.
मात्र पोलिस पोहोचण्याआधीच संशयित फरार झाल्याची माहिती मिळतेय.
सूत्रांच्या माहितीनुसार, त्या ठिकाणाहून काही आक्षेपार्ह वस्तूही सापडल्या आहेत.

संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे.
दरम्यान, सीसीटीव्हीत दिसलेला दुचाकीस्वार स्वतःहून पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला होता.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याने आपण निर्दोष असल्याचा दावा केला.
आता मोठा प्रश्न एकच —
हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवणारा खरा आरोपी कोण?
आणि या कटामागे नेमकं कारण काय?
सध्या ATS, गुन्हे शाखा आणि हडपसर पोलिस प्रत्येक अँगलने तपास करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.