अखेर चाकणकरांचा राजीनामा | NCP मध्ये मोठी हलचल

Rokhthok Maharashtra 2 0

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीला मोठा धक्का…
रुपाली चाकणकर यांनी अखेर प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे!
गेल्या काही दिवसांपासून अशोक खरात प्रकरणामुळे चाकणकर या प्रचंड वादात सापडल्या होत्या. खरात यांना ‘गुरू’ मानल्याच्या आरोपांमुळे पक्षांतर्गत दबाव वाढत होता.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर… आता त्यांनी पक्षातील महत्त्वाच्या पदाचाही त्याग केला आहे.
राजीनाम्यानंतर चाकणकर यांनी सोशल मीडियावर भूमिका स्पष्ट केली…

“खरात प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही…
सत्य तपासातून समोर येईल,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
तसेच, सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतरच राजीनामा दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी महिला आघाडीत मोठे बदल होणार का?
आणि पुढचा चेहरा कोण असेल?
याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.