“अध्यात्माच्या नावाखाली गैरवर्तन? पुण्यातील शिवदत्त आश्रम प्रकरण चर्चेत”

Rokhthok Maharashtra 20 0

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चांडोली येथील शिवदत्त आश्रम चालवणारा नवनाथ गवळी नावाचा व्यक्ती स्वतःला ‘महाराज’ म्हणवत होता. परिसरात लोक त्याला ‘मामा’ म्हणून ओळखत होते.
मात्र, एका महिलेने गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, दोष निवारणाच्या बहाण्याने आश्रमात बोलावून आरोपीने तिच्यासोबत अयोग्य वर्तन केले. तसेच अध्यात्माच्या नावाखाली गैरवर्तन आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

सुरुवातीला भीतीपोटी महिलेने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. पण त्रास वाढल्यानंतर तिने पतीला सर्व सांगितले. पतीच्या पाठिंब्यामुळे तिने पोलिसांत तक्रार केली.
या तक्रारीनंतर राजगुरुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, गुन्हा नोंद होऊनही आरोपी अद्याप फरार असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.