एका ठेकेदाराला फक्त 2 कामे! पुणे महापालिकेचा मोठा अॅक्शन प्लॅन

Rokhthok Maharashtra 1 0

पुणे महापालिकेच्या झाडणकाम निविदांमध्ये मोठा बदल करण्यात आलाय.
आतापासून एका ठेकेदाराला दोनपेक्षा जास्त कामे मिळणार नाहीत, असा मोठा निर्णय प्रशासनाने घेतलाय.
यापूर्वी झाडणकामाच्या निविदांमध्ये रिंग होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या.
ठरावीक ठेकेदारांनाच वारंवार मोठमोठी कामे मिळत होती.
काही ठिकाणी काम न करताही बिले काढली जात असल्याचे आरोपही झाले होते.
सध्या पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कोट्यवधी रुपयांची झाडणकाम निविदा प्रक्रिया राबवली जाते.
यामध्ये ईश्वर चिठ्ठी पद्धतीने कामांचे वाटप केले जाते.
मात्र या प्रक्रियेत दोन ठेकेदारांकडे तब्बल आठ क्षेत्रीय कार्यालयांची कामे गेल्याचं समोर आलं होतं.
यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी मोठा निर्णय घेत…
एका ठेकेदाराला जास्तीत जास्त दोनच निविदा देण्याचा नियम लागू केला आहे.
या निर्णयामुळे निविदा प्रक्रियेत पारदर्शकता येणार का?
आणि शहरातील झाडणकाम खरंच सुधारेल का?

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.