किरकाेळ कारणावरून पाेलीसाला शिवीगाळ करीत टाेळक्याकडून मारहाण,पाच जणाविरूध्द गून्हा दाखल

Rokhthok Maharashtra 1 0

प्रतिनिधी -स्वप्नील कदम

पुणे : किरकोळ कारणावरून टोळक्याने पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना भैरवनगर धानोरी येथे घडली.

याप्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत धवल रविकांत लोणकर (वय ३८, रा. भैरवनगर, धायरी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी धवल लोणकर हे विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात नाईक पदावर कर्तव्यास आहेत.

 

फिर्याद दाखल केल्यानुसार विजय सूर्यकांत केंजळे (वय २८,)
सूर्यकांत गणपतराव केंजळे (वय ५८), चंद्रकांत गणपतराव केंजळे (वय ५२), विशाल चंद्रकांत केंजळे (वय २४), निमेश किशोर जगताप
(वय २१, सर्व रा. गुडविल संस्कृती, भैरवनगर, धानोरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना रात्री साडे दहाच्या सुमारास भैरवनगर धानोरी लेन नंबर-१० येथे घडली.

पोलीसांनी दिलेल्या माहितनुसार , फिर्यादी लोणकर हे कुटुंबियांसोबत कार मधून घरी परत येत होते.
यावेळी भैरवनगर धानोरी लेन नंबर-१० येथे एक जण अचानक त्यांच्या कारसमोर आल्याने त्यांनी कार थांबवली. यावेळी आरोपी फिर्यादीच्या जवळ आला आणि माझ्या अंगावर गाडी का घातली? म्हणत शिवीगाळ करू लागला.

यावेळी फिर्यादी यांनी गाडीचा धक्का लागला नसल्याचे सांगितले.
तसेच, फिर्यादी लोणकर हे कारच्या खाली उतरल्यावर आरोपीने त्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. त्यानंतर इतर आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, त्यांच्यातील एका आरोपीने हत्याराने फिर्यादी यांच्या नाका, तोंडावर मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गंपले तपास करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.